खडवलीत नऊ वर्षाच्या चिमुकलीवर जन्म दात्यानेच केला बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

त्याने जन्म दिलेल्या मुलींवरच पाशवी अत्याचार केला आहे. त्यामुळे सर्वत्र संताप वेक्त होत आहे, ही घटना शनिवारी रात्री घडली आहे.

टिटवाळा - कल्याण तालुक्यातील खडवलीत पूर्वेला पाण्याच्या टाकी जवळ रहात असलेल्या राजू पाटील या नराधमाने बाप लेक या नात्याला काळीमा फासला आहे, त्याने जन्म दिलेल्या मुलींवरच पाशवी अत्याचार केला आहे, त्यामुळे सर्वत्र संताप वेक्त होत आहे, ही घटना शनिवारी रात्री घडली आहे. येथे रहाणार्या राजू पाटील (४३) याने आपल्या सख्या नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आहे. या घटनेमुळे खडवली परिसरात खळबळ उडाली आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आरोपी राजू पाटील हा आपली पत्नी व दोन मुलांसह खडवली येथील पाण्याच्या टाकी जवळ राहत आहे. त्याची पत्नी लोकल ट्रेन मध्ये भुईमुगाच्या शेंगा विकण्याचे काम करते. ती सकाळी गेली की रात्री उशीरा घरी येते. घरी नऊ (पिडीत) व एक तीन वर्षाची अशा दोन मुलीसह राजू पाटील राहतो. तो कुठल्याही प्रकारचे काम करत नसून दिवस भर घरीच असतो. शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास आपली तीन वर्षाची मुलगी झोपली असल्याचे पाहून त्याने आपल्या नऊ वर्षाच्या मुलीवर पाशवी अत्याचार केला. याबाबत कुणाला सांगितले तर मारून टाकील असा दम मुलीला भरला. परंतू सदर प्रकार मुलीने सकाळी आपल्या आईला सांगितला. यानंतर आईने बापाचा शोध घेतला. पण तो गायब झाला होता. या नंतर मुलीच्या आईने टिटवाळा पोलिस ठाण्यात धाव घेत राजू पाटिल विरूध्द तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी करून बापावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. टिटवाळा पोलीसांनी तपास करत ता. 18 ला सोमवारी रात्री राजू पाटील याला अटक करून कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिस उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे व टिटवाळा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सह्य पो. नि. राजेश खोपकर अधिक तपास करत आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: In Khadvala nine year old girl was raped by her father