आरोपींना कठोर शिक्षेची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

खालापूर - खालापूरमधील विणेगाव येथील "बेटर लाइफ फाउंडेशन' या व्यसनमुक्ती केंद्रात रुग्णांवर अत्याचार होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रदीप पटेल आणि मल्हार पटेल यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिक संघटनांकडून करण्यात येत आहे.

विणेगावात अशा प्रकारे व्यसनमुक्तीच्या नावाखाली छळ सुरू असल्याचे कुणालाच माहीत नव्हते. येथून सुटका केलेल्या रुग्णांनी त्यांच्यासोबत केल्या जाणाऱ्या अत्याचाराचा पाढा पोलिसांसमोर वाचल्यानंतर अनेक धक्कादायक प्रकरणे उघडकीस येत आहेत. येथे व्यसनमुक्ती केंद्रातील कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत येऊन रात्री-अपरात्री रुग्णांना लोखंडी सळईने मारहाण करत. रुग्णांचे व्यसन सुटू नये यासाठी त्यांच्यावर आणखी काही महिने उपचार करून रक्कम उकळता यावी म्हणून त्यांना जबरदस्तीने धूम्रपान करण्यास सांगितले जाई. याला नकार देणाऱ्यांना विडीचे चटके दिले जात, अशा प्रकारे दर महिन्याला लाखोंच्या घरात कमाई केली जाई.

Web Title: khalapur news crime punishment