खालापूरजवळ टॅंकरची बसला धडक; 10 जखमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

खालापूर - भरधाव टॅंकरने एका कंपनीच्या बसला दिलेल्या धडकेत गुरुवारी (ता. 8) 10 जण जखमी झाले. पुणे-मुंबई महामार्गावर हा अपघात झाला. याप्रकरणी नजीर मोहम्मद शेख (वय 36, रा. उस्मानाबाद) याच्या विरोधात खालापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

जखमींवर उपचार करून घरी सोडण्यात आले. शेख हा महामार्ग क्रमांक 4 वरून जात होता. खालापूर हद्दीत वरोसे गावाजवळ एका कंपनीच्या बसला टॅंकरने पाठीमागून जोरधार धडक दिली. या अपघातात दिलीप पिंगळे, जगन्नाथ पाटील, विशाल ठाकरे, अविनाश खेडेकर, सचिन पोलेकर, वैभव राजे, रूपेश चव्हाण, महेश बेडेकर, सचिन दानवक, वैभव शिंदे हे किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर पनवेल येथील गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: khalapur news mumbai news accident injured