टगबोटीतील खलाशांची नौदलाने केली सुटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

मुंबई - "राजभवन'जवळील समुद्रात अडकलेल्या टगबोटीतील चार खलाशांची नौदलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. खवळलेल्या समुद्रात ही धाडसी कामगिरी करण्यात आली. सुटका केलेल्या खलाशांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

सोनिका नावाची टगबोट सोमवारी (ता. 17) रात्री राजभवन आणि प्रस्तावित शिवस्मारकाजवळ अडकून पडली होती. त्यातील खलाशांनी याविषयी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कळवले. माहीम सागरी पोलिसांच्या पथकाला काही तांत्रिक कारणामुळे बोटीजवळ पोचणे शक्‍य नव्हते. त्यामुळे नौदलाची मदत मागण्यात आली. रात्री साडेअकराच्यादरम्यान नौदलाच्या "आयएनएस शिक्रा'वरून "42 सी' हे हेलिकॉप्टर झेपावले. अवघ्या 20 मिनिटांत चार खलाशांची सुटका करण्यात आली.

Web Title: khalashi release by navy