खारघरला 70 एमएलडी पाण्याची आवश्यकता; मिळते केवळ 56 एमएलडी

खारघरला 70 एमएलडी पाण्याची आवश्यकता; मिळते केवळ 56 एमएलडी

खारघर : खारघर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. सिडको अधिकाऱ्यांकडून कमी दाबाने येणाऱ्या पाण्याची योग्य ती माहिती नागरिकांना दिली जात नाही. ज्या लोकप्रतिनिधीला नागरिकांनी निवडून दिले. तेही छुपी साधून बसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

खारघरची लोकसंख्या तीन लाखांहून अधिक आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सिडकोकडून अल्प प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्यामुळे टँकरने पाणी घेऊन गरजा पूर्ण कराव्या लागत आहेत. मागील वर्षी खारघरमध्ये 60 एमएलडी पुरवठा होत असे. मात्र, त्यात वाढ होण्याऐवजी कमी झाले असून, सध्या खारघर केवळ 56 एमएलडी पाणी मिळत असल्यामुळे खारघरची अवस्था पाणीबाणी अशी झाली आहे.

उपअभियंता ते अधीक्षक अभियंताकडे नागरिकांनी तक्रारी केल्यास पाणी पुरवठा सुरळीत होईल, एव्हढेच उत्तर दिले जाते. खारघर परिसरात पाणी पुरवठा करीत असताना अचानक विधूत पुरवठा खंडित होणे. दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवणे असे प्रकार घडत असताना सिडको अधिकाऱ्याकडून योग्य ती प्रकारे माहिती दिली जात नाही.

पनवेल पालिका निवडणूकीपूर्वी खारघरमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत असताना खारघरमधून नवी मुंबईला जाणारी जलवाहिनी सिडकोच्या कार्यकर्त्यांनी फोडली होती. जलवाहिनी फोडणारे भाजपचे कार्यकर्ते आज नगरसेवक झाले. मात्र, पाणी समस्यावर काहीही करीत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

इकडे आड तिकडे विहिर

सिडको अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता हेटवणे धरणातून जेवढे पाणी प्राप्त होते. तेवढा पुरवठा केला जातो. पाणी साठा वाढविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कोणतेही दखल घेतली जात नाही. त्यामुळे नागरिक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना उत्तर देताना इकडे आड-तिकडे विहिर अशी अवस्था झाली असून, पाणी पुरवठा विभागातून इतर विभागात बदली व्हावी. अथवा सिडकोने खारघर वसाहती पालिकेकडे हस्तांतर करून आम्हाला यातून सुटका करावी, असे सांगितले.

गेल्या दहा दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सिडकोकडून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याची माहिती नागरिकांना दिल्यास योग्य नागरिक योग्य ती काळजी घेऊ शकते. मात्र, तसे होताना दिसत नाही. आमच्या सोसायटी 144 घरे आहेत. कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे.

- रजत वालेचा, गिरीराज होरीझोन  सोसायटी सेक्टर 20 खारघर 

नगरसेवक आणि सिडको अधिकाऱ्यांसमवेत काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत खारघरमधील काही भागात जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलण्याची तसेच काही भागात उभारलेले अतिरिक्त जलकुंभात पाणी साठवून अडचणीवेळी पुरवठा करणे आवश्यक आहे. मात्र, सिडकोत्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

- दीपक शिंदे, सरचिटणीस भाजप, खारघर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com