खारघर टेकडीवर वन्य प्राणीसाठी पाणवठा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

खारघर : गेल्या काही वर्षात सातत्याने दुष्काळ सदृश परिस्थितीचा सामना करताना वन्यजीवास वेळेवर पाणी न मिळाल्याने तहानेने व्याकुळ झालेल्या अनेक वन्यजीवांचे प्राण गमवावे लागल्याचे प्रकार घडले आहेत.खारघर मधील  शाश्वत फाउंडेशनने या सामाजिक संस्थेने वन्य जीवांची तहान भागविण्यासाठी  खारघर टेकडीवर रविवारी  पाच  पाणवठे उभारले  आहेत.संस्थने नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतल्याने संस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

खारघर टेकडीवर सिडको वन विभागाच्या वतीने निसर्ग उद्यान विकसित केला जात आहे. तर वन विभागाने गेल्या पाच वर्षात 30 हजाराहून अधिक झाडे लावून त्याचे देखभाल करीत असल्यामुळे विवीध पक्षाचे प्रमाणही वाढले आहे तसेच डोंगरावर काही वन्यजीव प्राणी देखिल असल्याचे खारघर टेकडीवरील ग्रामस्थ सांगतात. वन्यजीवासाठी आणि पक्षासाठी डोंगरावर पाण्याची  कोणत्याही प्रकारची सोय नसल्याचे पाहून शाश्वत फाउंडेशनने टेकडीवर विविध ठिकाणी प्लास्टिक ड्रमच्या माध्यमातून झाडा झुडुपांत पाणवठे उभारले आहे. त्यामुळे पक्षी आणि वन्यप्राण्यांसाठी सोयीचे झाले आहे.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जयेश गोगरी,परीक्षति गजरा,स्मिता आचार्य,प्राची देशपांडे,नवीन चौधरी,स्मिता श्रीवास्तव यांनी मेहनत घेतली. 

संस्थेचे पाच ठिकाणी पाणवठा उभारले आहे .एका पाणवठा मध्ये जवळपास  25 लिटर पेक्षा अधिक पाणी साठवून ठेवता येते,वन्यजीव आणि पक्ष्यांसाठी सोयीचे झाले आहे.
सुभाष राठोड, वन कर्मचारी वन विभाग पनवेल 

वन विभागाने लावलेल्या झाडांना पाणी घालताना या पाणवठा मध्ये दिवसाआड पाणी भरले जातील. वन विभागाकडून सहकार्य मिळत नसेल तर संस्थेकडून पाण्याची सोय केली जाईल.
- बिना गोगरी, अध्यक्ष शाश्वत फाउंडेशन

संस्थेने सुरु केलेले उपक्रम कौतुकास्पद आहे.वन्यजीवांना चोवीस तास पाणी मिळणार आहे.
- रघुनाथ जाधव,प्राणीमित्र आणि सर्प मित्र 

Web Title: kharghar group creates water storage for animal on hill