चारित्र्याच्या संशयावरून आईने केली मुलीची हत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

खारघर - दहावीची परीक्षा सुरू असताना चारित्र्यावर संशय घेऊन पोटच्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार खारघरमध्ये उघडकीस आला असून, या प्रकरणी खारघर पोलिसांनी मुलीच्या आईला अटक केली आहे. खारघर सेक्‍टर 19 मध्ये एका इमारतीत राहणारे बनोरीलाला सिंग सैनी (वय 37) हे बांधकाम ठेकेदार असून, पत्नी, 12 वर्षांचा मुलगा आणि मुलीसोबत राहतात. 4 मार्चला त्यांच्या मुलीने गळफास घेतल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान तिच्या वर्गातील मुलीची भेट घेऊन माहिती घेतली असता, आई-वडिलांनी तिच्यावर संशय घेतल्याचे सांगितले. ती एकटी असताना भांडण करून जीवे मारण्याचीही धमकी दिली होती.
Web Title: kharghar mumbai news girl murder by mother