खारघर होणार खड्डेमुक्‍त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

खारघर - सुनियोजित शहर म्हणून ओळख असलेल्या खारघरची खड्ड्यांचे शहर म्हणून ओळख होत आहे. याबाबत ‘सकाळ’ने पनवेल टुडे या अंकात वस्तुस्थिती मांडली होती. पाणीप्रश्‍न, कचऱ्याची समस्याही कायम आहे. या विविध समस्यांकडे सिडकोने लक्ष द्यावे, असे लेखी निवेदन नगरसेविका नेत्रा पाटील यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांना दिले आहे.  या प्रकरणी गगराणी यांनी कार्यकारी अिभयंत्यांना १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश िदले आहेत. या वेळी ‘सकाळ’ पनवेल टुडेचा अंकही नेत्रा पाटील यांनी दिला. 

खारघरच्या रस्त्याची दुरवस्था, कचरा समस्या आणि पाणीप्रश्‍न याबाबत चर्चा करण्यासाठी नेत्रा पाटील यांनी गगराणी यांच्याकडे बैठकीसाठी वेळ मागितली होती. शुक्रवारी (ता. १४) गगराणी यांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीत नगरसेविका पाटील यांनी खारघरच्या रस्त्यावरील खड्ड्यांचा पाढा वाचला. रस्तेदुरुस्तीचे काम पावसाळ्याआधी करणे आवश्‍यक असताना, अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने खारघर हे खड्ड्यांचे घर झाले आहे. याबाबत ‘सकाळ’ने ११ जुलैला पनवेल टुडे पुरवणीत खड्ड्यांची बातमी असलेला अंक गगराणी यांच्या हाती देत, खड्ड्यांच्या ठिकाणांसह याची माहिती यात आहे. त्यामुळे सर्व रस्त्यांची दुरुस्ती वेळीच केली जावी, अशी मागणी यांनी दिली. येथील काही ठिकाणी वेळेवर कचरा उचलला जात नाही. अनियमित पाणीपुरवठा यामुळे नागरिक त्रस्त असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.  

सेक्‍टर १९ मधील भूखंड क्रमांक २८ आणि २९ च्या बाजूला असेलल्या तलावात डेब्रिज टाकून भरावाचे काम सुरू आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. येथील ड्रीम हाईट्‌स, पूजा रेसिडेन्सी, केशर, पायल, शिवकृपा, मोनार्च या इमारतीतील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास होत असल्याची तक्रार त्यांनी केली. यावर कार्यकारी अभियंता के. के. वरखेडकर यांना १५ दिवसांत अहवाल देण्याचे आदेश गगराणी यांनी दिले. 

परिस्थिती सुधारा
खड्ड्यांचे घर खारघर या शीषर्काखाली आलेल्या बातमीत खारघरच्या रस्त्यांची परिस्थिती मांडली होती, यामुळे िवभागात वाहतूक खोळंबा होत आहे. याबाबत सिडको प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नेत्रा पाटील यांनी अिधकाऱ्यांना "सकाळ'चा अंक दिला. 

Web Title: Kharghar news new mubai news pothole