खारघर टोल चौकशीस "एसीबी'ची परवानगी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

मुंबई - शिव-पनवेल महामार्ग रुंदीकरण प्रकल्पातील खारघर टोल निविदा गैरव्यवहाराच्या आरोपांची खुली चौकशी करण्याकरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) परवानगी दिली आहे, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली. 

शिव-पनवेल महामार्गाच्या कामात गैरव्यवहार झाल्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्या. रणजित मोरे आणि न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. मागील सुनावणीवेळी खारघर टोलप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक खात्याला चौकशीची परवानगी का नाही, असा सवाल उच्च न्यायालयाने विचारला होता. तसेच, खारघर टोल वसुलीच्या निविदेसंदर्भात दाखल याचिकेवर न्यायालयाने सरकारला फैलावर घेतले होते. त्यावर ठाण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त किसन गवळी यांच्यामार्फत या प्रकरणाची खुली चौकशी केली जाईल, अशी माहिती सरकारने उच्च न्यायालयात दिली. 

Web Title: Kharghar toll of inquiries