खारघरचे पाणी परवानगीच्या नळात

खारघरचे पाणी परवानगीच्या नळात
खारघरचे पाणी परवानगीच्या नळात

नवी मुंबई : सिडकोच्या विनंतीवरून खारघर शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याच्या नवी मुंबई महापालिकेच्या निर्णयाची अंमलबजावणी अभियांत्रिकी विभागाच्या अभिप्रायावर अवलंबून आहे. खारघर शहराला सध्या दिल्या जात असलेल्या पाण्यात आणखीन ५ एमएलडीची वाढ केल्यास शहरातील पाणीपुरवठा कमी करावा लागण्याची भीती अभियांत्रिकी विभागाला आहे. त्यामुळे सध्या तरी अभियांत्रिकी विभाग पाणीपुरवठा करण्याकरिता साशंक असल्याने खारघरकरांच्या नशिबी प्रतीक्षाच येण्याची शक्‍यता आहे. 

पनवेल महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या सिडकोच्या नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली कॉलनी, खारघर व कामोठे या भागाला विविध जलस्रोतांमधून पाणी घ्यावे लागते. यामध्ये  कामोठे येथील भागाला ४० एमएलडी पाणीपुरवठ्यासाठी मोरबे धरणातील साठा वापरला जातो; परंतु सध्या ज्या जलवाहिन्यांद्वारे खारघरला पाणीपुरवठा केला जात आहे, त्या जिर्ण झाल्याने गळती होऊन आवश्‍यक तेवढ्या दाबाने पाणीपुरवठा खारघरला होत नसल्याने खारघरकरांना उन्हाळ्याआधीच पाणीटंचाई भासू लागली आहे. मोरबे धरणाच्या भोकरपाडा केंद्रामार्फत नवी मुंबई शहराच्या वाट्याला ३७० ते ३६५ एमएलडी पोहोचते; परंतु आता खारघरला अतिरिक्त पाच एमएलडी पाणी द्यायचे असेल, तर नवी मुंबई शहराला सध्या सुरू असलेल्या पाणीपुरवठ्यातून काही कोटा देता येईल का, हे पाहताना शहरातील पाणीपुरवठा कमी होणार नाही. हे लक्षात घेऊनच खारघरचा पाणीप्रश्‍न सुटू शकतो.

सिडको संचालक लोकेश चंद्र यांच्या मागणीनुसार खारघरला पाणी देण्याचे महापालिकेच्या विचाराधीन आहे. त्यानुसार अभियांत्रिकी विभागाच्या अभिप्रायाची आम्ही वाट पाहत आहोत. पाणीपुरवठा करताना नवी मुंबई शहराला तुटवडा जाणवणार नाही, हे आधी पाहावे लागेल. 
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com