नाल्यात पडलेल्या दिव्यांशचा शोध सुरुच 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

बुधवारी रात्री मालाड येथील नाल्यात पडलेल्या दिव्यांश या दिड वर्षाच्या मुलाचा अद्याप शोध लागलेला नाही. आतापर्यंत विविध यंत्रणांच्या 150 कर्मचारी अधिकाऱ्यांनी दिव्यांशचा शोध घेतला. मात्र त्यांना यश आले नाही.

मुंबई : बुधवारी रात्री मालाड येथील नाल्यात पडलेल्या दिव्यांश या दिड वर्षाच्या मुलाचा अद्याप शोध लागलेला नाही. आतापर्यंत विविध यंत्रणांच्या 150 कर्मचारी अधिकाऱ्यांनी दिव्यांशचा शोध घेतला. मात्र त्यांना यश आले नाही.

गुरुवारी रात्रभर हे शोधकार्य सुरु होते. मुंबई अग्निशमन दल तसे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकाने दहा किलो मिटर लांबीच्या नाल्यात चालून शोध घेतला.मात्र त्यांना यश आले नाही. तसेच तीन मॅनहोल्स मध्येही तपासण्यात आले.

या प्रकरणामुळे स्थानिक नागरीक संतप्त झाले आहेत. दुपार पर्यंत दिव्याशचा शोध न लागल्यास आंदोलन छेडण्याचा इषारा देण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a kid felled in grain channel still not found