पुण्यातून मूल पळवणारी ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

मुंबई - पुणे रेल्वेस्थानकातून चार महिन्यांचे मूल पळवल्याच्या आरोपावरून बुधवारी (ता.22) ओशिवरा पोलिसांनी मनीषा काळे हिला ताब्यात घेतले. रेल्वे पोलिसांनी तिला पुढील कारवाईसाठी पुण्याला नेले आहे. 

या मुलाची आई पुणे मंडई परिसरात भिक्षा मागून पोट भरते. 17 ऑगस्टला ती मुलासह पुणे रेल्वेस्थानकाच्या फलाट क्र. 2 वर झोपली होती. तिच्यासोबतच झोपलेल्या दोन महिलांनी हे मूल पळवले होते. दुसऱ्या दिवशी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पुणे रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. 

काही दिवसांपूर्वी आरोपी मनीषा पुण्याला गेली होती. ती नुकतीच ओशिवरा परिसरात परतल्यावर सोबत चार महिन्यांचे मूल पाहून एका व्यक्तीला संशय आला. त्याने पोलिसांना ही माहिती कळवली. वरिष्ठ निरीक्षक शैलेश पासलवाड यांच्या पथकाने मनीषाला ताब्यात घेतले. भीक मागून पैसे कमावण्यासाठी तिने मूल चोरल्याची कबुली दिली. 

Web Title: kidnapper arrested in mumbai