सत्तर वर्षांच्या आईचे मुलाला मूत्रपिंडदान 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

मुंबई - सत्तर वर्षांच्या आईने आपल्या मुलाला मूत्रपिंडदान करून त्याला जीवदान दिले. तसेच अवयवदानात वयाचा अडथळा येऊ शकतो का, ही डॉक्‍टरांना असलेली शंकाही दूर झाली. नानावटी रुग्णालयात नुकतीच ही शस्त्रक्रिया झाली. 

मुंबई - सत्तर वर्षांच्या आईने आपल्या मुलाला मूत्रपिंडदान करून त्याला जीवदान दिले. तसेच अवयवदानात वयाचा अडथळा येऊ शकतो का, ही डॉक्‍टरांना असलेली शंकाही दूर झाली. नानावटी रुग्णालयात नुकतीच ही शस्त्रक्रिया झाली. 

उत्तर प्रदेशातील जुनैद (नाव बदलले आहे) या 45 वर्षांच्या व्यक्तीला गुंतागुंतीचा मूत्रपिंडाचा विकार होता. त्यामुळे त्याची दोन्ही मूत्रपिंडे काढावी लागणार होती. केवळ दुसऱ्याने मूत्रपिंडदान केले तरच त्याचा जीव वाचणार होता. त्याची आई आणि पत्नीला त्याला मूत्रपिंड दान करणे शक्‍य होते; मात्र त्याच्या 70 वर्षांच्या आईने मूत्रपिंडदान करण्याची इच्छा व्यक्त केली. आईचे वय जास्त असल्याने तिला मूत्रपिंडदान करता येईल का, हे तपासण्यासाठी काही चाचण्या करण्यात आल्या. त्या सर्वसामान्य आल्या. त्यानंतर शस्त्रक्रियाही यशस्वी झाली. दोघांचीही प्रकृती ठणठणीत आहे. 

अवयवदानासाठी पुढे या! 
आज देशात पावणेदोन लाख गरजूंना मूत्रपिंडांची गरज आहे. देशात दर वर्षी फक्त पाच हजार लोकच मूत्रपिंडदान करतात. यासाठी अवयवदान मोठ्या प्रमाणावर झाले पाहिजे. अवयवदानात वय हा अडथळा येत नाही, हे या शस्त्रक्रियेने सिद्ध केले आहे. त्यामुळे दात्यांनी पुढे यावे, असे रुग्णालयातील डॉक्‍टरांनी सांगितले. 

Web Title: Kidney donation of seventy-year-old mother's child

टॅग्स