'किकी' करणाऱ्यांना रेल्वे स्थानक सफाईची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

मुंबई - सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले "किकी चॅलेंज' स्वीकारत काही दिवसांपूर्वी विरार रेल्वे स्थानकात लोकलसमोर नृत्य करणाऱ्या तिघांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांनी चॅलेंज पूर्ण केल्याचे दर्शविणारा व्हिडिओही सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्यांना तीन दिवस वसई रेल्वे स्थानकाची स्वच्छता करण्याची शिक्षा आज रेल्वे न्यायालयाने सुनावली.

निशांत शाह (20), ध्रुव शाह (23) आणि श्‍याम शर्मा (24) अशी या तिघांची नावे आहेत. हे तिघे अनेक व्हिडिओ बनवून ते ध्रुव "फन्चो एन्टरटेन्मेंट'च्या बॅनरखाली य-ट्यिूबवर अपलोड करतात. निशांत हा टीव्हीवरील मालिकांमध्ये काम करतो. या तिघांनी यापूर्वी रुग्णवाहिकेसमोर "किकी' डान्स केला होता. त्या रुग्णवाहिकेच्या चालकाकडे विचारपूस केल्यावर या तिघांची ओळख पटली. या तरुणांनी रेल्वे स्थानक स्वच्छ केल्याचे व्हिडिओ तयार करून ते न्यायालयात सादर करावे. त्यानंतरच त्यांच्या पुढील शिक्षेबाबत सुनावणी होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Web Title: kiki challenge railway station cleaning punishment railway court