लोकलमधील "किकी डान्स' महागात

Local
Local

मुंबई - धावत्या लोकलमध्ये "किकी डान्स' करणाऱ्या तिघांना मंगळवारी (ता. 4) रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) अटक केली. सुराह गौतम, अब्दुल युसूफ, कन्हैया कुमार अशी त्यांची नावे आहेत. ते उच्चशिक्षित आहेत. व्हिडिओला जास्त हिट मिळून पैसे मिळतील, यासाठी त्यांनी लोकलमधील किकी डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता.

जुलैमध्ये त्यांचा सीएसटी रेल्वे स्थानकात धावत्या लोकलमधील व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरलप्रकरणी आरपीएफने गंभीर दखल घेतली. व्हिडिओला वाढते हिट पाहता आरपीएफची डोकेदुखी वाढली होती. याचा तपास करण्यासाठी आरपीएफने वांद्रे-कुर्ला संकुलातील सायबर पोलिसांची मदत घेतली. त्यांनी व्हिडिओ अपलोड झालेल्या ठिकाणाची तांत्रिक माहिती आरपीएफला दिली. त्यानुसार आरपीएफने धारावी परिसरातून त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी संबंधित व्हिडिओ अपलोड केल्याची कबुली दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com