शंभर रुपयांवरून मित्राची हत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

मुंबई - मालाड येथे शुक्रवारी (ता. 2) शंभर रुपयांच्या उधारीवरून मित्राची हत्या करण्यात आली. साजिद ऊर्फ सज्जू सय्यद शेख (वय 25) असे हत्या झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी नीतेश अनिल मिश्रा याला कुरार पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मालाड पूर्वमधील क्रांतीनगरमध्ये काम करणाऱ्या साजिदने नीतेशकडून काही पैसे उधार घेतले होते. त्यापैकी 100 रुपये साजिदने परत केले नव्हते. यावरून साजिद आणि नीतेश यांच्यात वाद झाला. त्यांच्यात कादीर या मित्राने मध्यस्थी करून वाद मिटवला होता; मात्र त्यानंतर पुन्हा रागाच्या भरात नीतेशने कादीर आणि साजिदवर चाकूहल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या साजिद याचा मृत्यू झाला. कुरार पोलिसांनी काही तासांतच नीतेशला अटक केली.

Web Title: Killing friend for hundreds Rupees