किंग्ज सर्कल स्थानकातील लाद्या पावसाने खचल्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

वडाळा - जोरदार पावसामुळे हार्बर मार्गावरील किंग्ज सर्कल रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक एकवरील लाद्या खचल्याचे मंगळवारी सकाळी १० च्या दरम्यान निदर्शनास आले. फलाटावरील भिंतही जीर्ण झाल्याने ती केव्हाही कोसळण्याची शक्‍यता आहे.  

लाद्या खचल्याची माहिती वडाळा लोहमार्ग पोलिस निरीक्षक शिवाजी आवटे यांनी दूरध्वनीद्वारे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली आहे; मात्र एवढी गंभीर बाब असूनही रेल्वे प्रशासनाचा एकही कर्मचारी घटनास्थळी पोचला नव्हता. शाळा, महाविद्यालये तसेच  सायन रुग्णालय जवळ असल्याने किंग्ज सर्कल स्थानकात विद्यार्थी, प्रवासी व रुग्णांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. संततधारेमुळे स्थानकात मंगळवारी सकाळपासूनच प्रवाशांची गर्दी कमी असल्याने अनर्थ टळला; परंतु पावसाचा जोर ओसरला तरीही भिंत कोसळण्याची शक्‍यता कायम आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी करत आहेत. 

Web Title: Kings Circle station