esakal | छत्रपतींचे वंशज किरणराजे ‘रिपब्लिकन'च्या उपाध्यक्षपदी
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

छत्रपतींचे वंशज किरणराजे ‘रिपब्लिकन'च्या उपाध्यक्षपदी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मालाड : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (Republican Party of India) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी छत्रपती शिवाजी महाराज यांचे १४ वे वंशज किरणराजे भोसले यांची अधिकृत निवड करण्यात आल्याची घोषणा रिपब्लिकन (Republican) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athvale) यांनी आज केली. त्यांना नियुक्तीपत्र देऊन जबाबदारी देण्यात आली.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यातील ४३ मंडळामध्ये अतिवृष्टी; धरणसाठा ९० टक्के

किरणराजे भोसले हे नाशिक येथे वास्तव्यास असून रिपाई (आठवले गट) चे नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी त्यांचे रिपाइंमध्ये स्वागत केले आहे. मालाड तालुका अध्यक्ष सुनील गमरे यांनी किरणराजे भोसले अभिनंदन केले आहे. रामदास आठवले यांनी सर्वप्रथम लोकसभेत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. आठवले यांचा मराठा समाजातील आर्थिक दुर्बल समाजाला नेहमी पाठिंबा राहिला असल्याने आपण रामदास आठवलेंच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला असल्याचे किरणराजे भोसले यांनी या वेळी म्हटले आहे.

loading image
go to top