भाजप नेते किरीट सोमय्या यांचा राज्य सरकारवर निशाणा, वाचा सविस्तर

भाग्यश्री भुवड | Saturday, 12 September 2020

कोविडसाठी देण्यात आलेल्या 72 छोटी रुग्णालयांना नॉन कोविड करण्याच्या निर्णयावर फेरविचार व्हावा असे मत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केले आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबई: कोविडसाठी देण्यात आलेल्या 72 छोटी रुग्णालयांना नॉन कोविड करण्याच्या निर्णयावर फेरविचार व्हावा असे मत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केले आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबईत गेल्या आठवडाभरात 11,091 रुग्ण समोर आले. त्यामुळे, आयसीयू बेड्सचा तुटवडा जाणवू लागला आहे. पालिका रुग्णालये आणि आयसीयू बेड्सची संख्या वाढवण्याच्या जागी ती कमी करण्याचा प्रयत्न करतेय. त्यात पालिकेने 72 कोविड 19 वर उपचार देणारी छोटी रुग्णालये बंद करण्याचा निर्णय घेतला. 

त्यामुळे, हा निर्णय मागे घेत पुन्हा या निर्णयावर फेरविचार करून ही रुग्णालये पुन्हा कोविड 19 साठी खुली करावीत अशी मागणी केली आहे. 

 

मध्यंतरी या रुग्णालयात मृत्यू होण्याचे प्रमाण वाढते आहे असे लक्षात आल्यावर पालिकेने ही रुग्णालये कोविड 19 साठी बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ही रुग्णालये बंद झाल्यामुळे आणि मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने आयसीयू बेड्सची कमतरता भासू लागली आहे.

अधिक वाचाः  सावधान! मुंबईतल्या 'या' भागात वाढतोय कोरोनाचा धोका

गुरुवारी एका दिवसात दोन हजार रुग्णांची एकाच दिवशी भर पडली. त्यामुळे, सक्रिय रुग्णांची संख्या 26,632 एवढ्यावर पोहोचली आहे. तर, भारतात संपूर्ण जगाच्या तुलनेत सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या आहे. मृत्यू आणि केसेसमध्ये भारतात इतर देशांच्या तुलनेत जास्त रुग्ण आढळले आहेत.

----------------------

(संपादनः पूजा विचारे)

Kirit Somaiya demands reconsideration decision make 72 small hospitals non covid