वन रुपी क्‍लिनिक टप्प्याटप्प्याने बंद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

मुंबई  - रेल्वे स्टेशनवर चालणाऱ्या वन रुपी क्‍लिनिक आणि मॅजिक दिलच्या कामावर खासदार किरीट सोमय्या यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. रेल्वे हद्दीत चालणाऱ्या या क्‍लिनिकचा रिव्ह्यू करण्याची, तसेच नवीन वर्षात येणाऱ्या टेंडरच्या वेळी यांसारख्या क्‍लिनिकच्या कामात अधिक पारदर्शकता आणण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीनंतर वन रुपी क्‍लिनिकने मध्य रेल्वे स्टेशनवरील क्‍लिनिक बंद करणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाला कळवले आहे. 

दीड वर्षापासून वन रुपी क्‍लिनिक आणि मॅजिक दिल कंपनीचे काम सुरू आहे. कोर्टाच्या आदेशानंतर रेल्वे हद्दीत एमर्जन्सी मेडिकल रूम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मॅजिक दिल हेल्थ फॉर ऑल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी टेंडरप्रक्रियेत आलेली एकमेव कंपनी असल्याने या कंपनीला रेल्वे स्टेशनवर वन रुपी क्‍लिनिक सुरू करण्याची संधी मिळाली. या क्‍लिनिकच्या कामाचा आढावा घेण्यात यावा, त्याच्याद्वारे आगामी टेंडर प्रक्रियेत टेंडर भरणाऱ्या कंपन्यांसाठी काही नियम आणि अटी समाविष्ट कराव्यात, अशी मागणी केल्याचे खासदार किरीट सोमय्या यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. यामध्ये कामातील पारदर्शकता, जबाबदाऱ्या आणि काही महत्त्वाच्या बाबींचा समावेश करण्यात यावा असे ते म्हणाले. एक रुपयात क्‍लिनिक कसे चालू शकते? ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. क्‍लिनिकला महिनाभरासाठी लागणाऱ्या वस्तूंचा खर्च आहेच. तसेच डॉक्‍टर आणि इतर खर्चाचा विचार केला तर एक रुपयात हे शक्‍य नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले. तसेच यासाठी रेल्वे प्रशासनाने फक्त खोली दिली जाते असे सांगितले. 

रेल्वे प्रशासनाकडे आलेल्या तक्रारींनंतर आणि आरोपांनंतर मुलुंड, विक्रोळी आणि वाशी येथील क्‍लिनिक बंद करणार असल्याचे कळते. तसेच टप्प्याटप्प्याने इतर क्‍लिनिक बंद करण्यात येतील, असे डॉ. घुले यांनी सांगितले. 

आरोप फेटाळले 
मॅजिक दिल हेल्थ फॉर ऑल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रमुख डॉ. राहुल घुले यांनी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांचे खंडन केले. हे आरोप राजकीय हेतूने होत असल्याचे त्यांचे मत आहे. मॅजिक दिल कंपनीची कंपनी कायद्यानुसार नोंदणी आहे. तसेच मॅजिक दिलच्या वन रुपी क्‍लिनिकद्वारे 50 हजार रुग्णांना तपासण्यात आले आहे. 1500 रुग्णांना गोल्डन अवर (सुवर्ण तास) मध्ये उपचार देण्यात आल्याचे सांगितले. त्यामध्ये रेल्वेमध्ये किंवा प्लॅटफॉर्मवर झालेल्या तीन प्रसूतींचा समावेश आहे. मध्य रेल्वेवर 20 क्‍लिनिक सुरू करण्यासाठी गतवर्षी मॅजिक दिलने अनामत रक्कम म्हणून 20 लाख रुपये जमा केले आहेत. त्यापैकी 12 क्‍लिनिक वर्षभरात सुरू झाल्याची माहिती डॉ. घुले यांनी दिली. 

Web Title: kirit somaiya one rupee clinic closed