Anil Parab ED Raid | 'कपड्याची बॅग भरा...', ED चं पथक दाखल होताच किरीट सोमय्यांचा व्हिडीओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kirit Somaiya

'कपड्याची बॅग भरा...', ED चं पथक दाखल होताच किरीट सोमय्यांचा व्हिडीओ

परिवहन मंत्री आणि सेनेचे नेते अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी आज पहाटेपासून सक्तवसुली संचलनालयाने छापेमारी सुरू केली आहे. यासोबत त्यांच्या वांद्र्यातील घरातही कारवाईला सुरुवात झाली असून राज्यातील एकूण सात ठिकाणी ही कारवाई सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. (ED Raids Anil Parab House)

किरीट सोमय्या यांनी केंद्रात अनिल परब यांच्याविरोधात तक्रार केली होती. सोमय्यांनी १०० कोटींचं प्रकरण लावून धरलं होतं. अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाल्यानंतर वाझेनेही अनिल परब यांचं नाव घेतलं होतं. परबांचे पार्टनर संजय कदम यांच्या घरातूनही मोठं घबाड हाती लागलं होतं. तर बदल्यांच्या रॅकेटमध्ये अनिल परब यांचा वरदहस्त असल्याची माहिती होती. त्यातून ईडीने आज कारवाई केली. (Anil Parab ED Raid)

दरम्यान, सक्तवसुली संचलनालयाची कारवाई सुरू होताच किरीट सोमय्यांनी व्हिडीओ ट्वीट केला आहे.

अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता अनिल परबांनी कपड्याची बॅग तयार ठेवावी असं सोमय्यांनी म्हटलं आहे. अनिल परब आणि संजय कदम यांचे संबंध आहेत. परब यांच्यावरोधात उद्धव ठाकरे सरकारनेच गुन्हा दाखल केला होत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीच परबांचा काटा काढल्याचं सोमय्यांनी म्हटलंय.

हेही वाचा: शिवसेना राज्यसभेसाठी अर्ज करण्याआधी अनिल परबांच्या घरी ED ची छापेमारी

Web Title: Kirit Somaiya Tweeted Video After Ed Raid On Anil Parab

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Anil parab
go to top