दापोली पोलीस स्टेशनच्या आगीत अनिल परबांविरोधातील कागदपत्र जळाली? सोमय्यांना भीती

Kirit Somaiya
Kirit Somaiyaesakal

दोन दिवसांपूर्वी रत्नागिरीतील दापोलीच्या पोलीस स्टेशनला आग लागली. यामध्ये पोलीस स्टेशनच्या काही भागातील कागदपत्र जळल्याचं समोर आलंय. (Kirit Somaiya Tweets on Dapoli Police Station Fire)

मात्र ही आग लावण्यात आल्याचा संशय काहींनी व्यक्त केला आहे. अनिल परब यांच्या मालकीचे अनधिकृत रिसॉर्ट असल्याची तक्रार किरीट सोमय्यांनी याच पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. यासाठी ते मुंबईहून कोकणात दाखल झाले होते. आता पोलीस स्टेशनला लागलेल्या आगीत ही कागदपत्र जळाल्याची भीती सोमय्यांनी व्यक्त केली आहे.

Kirit Somaiya
रत्नागिरी | दापोली पोलीस ठाण्याला आग, अग्निशमनचे जवान तत्काळ दाखल

काय आहे प्रकरण?

अनिल परब यांचं रिसॉर्ट अनधिकृत आहे. तसेच महाराष्ट्र कोस्टल झोन अथॉरिटीने यासंबंधी माहिती दिल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सांगितलं. अनिल परब यांच्यावर पर्यावरण कायदा कलम 15 आणि 19 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. तसेच यासंबंधी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अनिल परब यांनी काही जणांशी संगनमत करुन कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता 'सीआरझेड'चे उल्लंघन करून बनावटी कागदपत्रे आणि आवश्यक पुरावे तयार केले. यानंतर दापोलीत 22 डिलक्स खोल्यांचं 4 स्टार रिसॉर्ट बांधण्यात आलं. यासाठी 10 कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती सोमय्यांनी दिली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com