
जपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री आणि मिसेस मुख्यमंत्र्यांवर म्हणजेच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री आणि मिसेस मुख्यमंत्र्यांवर म्हणजेच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. अर्णब गोस्वामी यांना ज्याप्रकरणी अटक झाली त्या अन्वय नाईक यांच्याकडून रश्मी ठाकरे यांनी जमीन खरेदी केली होती. रश्मी ठाकरे यांच्यासोबत मनीषा वायकर यांचे देखील जमिनीच्या ७/१२ वर नाव आहे. त्यामुळे सोमय्या यांनी या जमीन व्यवहाराची चौकशी व्हावी अशी मागणी केलीये.
सोबतच किरीट सोमय्या म्हणालेत की, अर्णब गोस्वामी यांना झालेली अटक आणि या जमीन व्यवहाराचा काही संबंध तर नाही ना? वैयक्तिक कारणामुळे मुख्यमंत्री अर्णब गोस्वामी यांना टार्गेट करत आहेत का ? असा गंभीर सवाल सोमय्या यांनी विचारला आहे. हा जमीन व्यवहार नक्की काय आहे, हे महाराष्ट्राची जनता विचारतेय असं सोमय्या म्हणालेत.
महत्त्वाची बातमी : मृतक एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाखांची मदत; एसटी कामगार सेनेची कुटुंबियांना भावनिक साद
या संबंधात किरीट सोमय्या यांनी ट्विट देखील केलंय. या ट्विटसोबत त्यांनी जमीन व्यवहाराचे ७/१२ जोडले आहेत.
ठाकरे परिवार अन्वय नाईक परिवार जमीन व्यवहार •गाव- कोलेई तालुका- मुरुड जिल्हा- रायगड महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वेबसाईटवर गाव नमुना ७/१२ प्रमाणे अक्षता व अन्वय नाईक, रश्मी उध्दव ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांची नावे नव ठिकाणी दिसत आहेत. @BJP4Maharashtra@Dev_Fadnavis pic.twitter.com/w5PzrNQI96
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 11, 2020
महत्त्वाची बातमी : सल्ले देण्यापेक्षा शिवसेनेने आत्मचिंतन करावं; संजय राऊतांच्या प्रतिक्रियांवर फडणवीसांचे टीकास्त्र
रवींद्र वायकर यांचे स्पष्टीकरण :
याप्रकरणी शिवसेना नेते रवींद्र वायकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सदर जमीन खरेदी अधिकृतरीत्या झाली होती. कुणी कुणाकडून जमीन खरेदी करू नये का ? जी काही खरेदी झाली आहे ती अधिकृतरीत्याच झाली आहे. याबाबतची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांना सोबतच आयकर विभागाला देखील देण्यात आली आहे. त्यामुळे कुणी कुणाकडून खरेदी करावी किंवा करू नये हे सांगणारे हे कोण असा सवाल रवींद्र वायकर यांनी विचारला आहे. काही लोकांना सध्या भीती वाटत असेल, म्हणून काहीतरी उकरून काढण्याचा प्रयत्न सुरु आहे म्हणूनच हे कारभार सुरु आहेत असेही रवींद्र वायकर म्हणालेत.
kirit somayya anvay naik rashmi thackeray property deal arnab goswami