तुम्हाला 'महाशक्ती'सोबत जायचं असेल तर जाऊ शकता - पेडणेकर

महाशक्ती सोबत तुम्ही जाऊ शकता, कुणी कुणाला आडवू शकत नाही.
Kishori Pednekar latest news
Kishori Pednekar latest news sakal media

शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी पुकारलेल्या बंडानंतर आता महाविकास आघाडी सरकारला थेट धक्का पोहोचला आहे. यामुळे आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकी जोर धरू लागल्या आहेत. दरम्यान, शिवसनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता मित्रपक्षांच्या हालचाली वाढल्या असल्याचे चित्र आहे. दरम्यान, आता शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (maharashtra politics)

Kishori Pednekar latest news
'आता वेळ आमची'; पवारांच्या भेटीनंतर राऊतांचा आत्मविश्वास वाढला

त्या म्हणाल्या की, महाशक्ती म्हणजे भाजप असून भाजपचं आम्हाला समर्थन असल्याचं काल शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं महाशक्तीसोबत तुम्ही जाऊ शकता, कुणी कुणाला आडवू शकत नाही. म्हणूनच, ज्यांना भाजपासोबत जायचं त्यांनी आत्ताच जावं असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितंल आहे.

न्यायालयीन बाजू थोडीफार आम्हालाही कळते. त्यामुळे जो काही निर्णय होईल ते तेव्हा पाहु, त्यावेळी बोलू असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. सायंकाळी विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांची बैठक होत आहे. आता पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. या सर्व घडामोडींमध्ये नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या यावर बैठकीत चर्चा होणार आहे. जुन्या वॉर्डप्रमाणे नगरसेवकांना सूचना दिल्या जाणार आहेत, असंही त्या म्हणाल्या आहेत.

Kishori Pednekar latest news
महाविकास आघाडी सरकार बहुमत सिद्ध करेल, शरद पवारांना विश्वास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com