किवी, ड्रॅगनफ्रूट आणि पपई डेंगी रुग्णांना नको!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

मुंबई - डेंगी झालेल्या रुग्णाला किवी, ड्रॅगनफ्रूट आणि पपई अशी फळे खाण्याचा सल्ला दिला जातो; परंतु मुंबई महापालिकेला ते मान्य नाही. रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या रुग्णांना अशी फळे देण्यास पालिकेने नकार दिला आहे.

ड्रॅगनफ्रूट आणि किवीच्या पौष्टिक घटकांची माहिती उपलब्ध नसल्याने ती रुग्णांना देता येणार नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तशी माहिती महासभेच्या पटलावर ठेवण्यात आली आहे. 

किवी आणि ड्रॅगनफ्रूटमुळे रक्तातील प्लेटलेटस्‌ वाढतात, असा दावा केला जातो. डेंगी झाल्यास पपई खाण्याचाही सल्ला दिला जातो. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या रुग्णांना अशी फळे देण्याचा प्रस्ताव फेब्रुवारीमध्ये भाजपचे सुषम सावंत यांनी महासभेत मांडला होता. परंतु, त्यांच्या पौष्टिक घटकांची माहिती नसल्यामुळे प्रशासनाने त्यास नकार दिला आहे. पपई कापून देताना रोगजंतूंचा प्रादुर्भाव आणि जीवनसत्त्वांचा ऱ्हास होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पपई देणेही योग्य ठरणार नाही, असे महापालिकेने अहवालात नमूद केले आहे.

हंगामी फळेच उत्तम
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन यांच्या भारतीय अन्नपदार्थांच्या तक्‍त्यात किवी आणि ड्रॅगनफ्रूट यांचा समावेश नाही, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महापालिका रुग्णालयांतील आहारतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात पिकणारी हंगामी फळे रुग्णांना देणे उचित आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Kiwi Dragonfruit papaya Dengue Patient