ठाण्यात दिवसाढवळ्या तरुणीवर चाकू हल्ला, तरुणीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

ठाण्यात नवीन आरटीओजवळ दिवसाढवळ्या कॉलेज तरुणीवर चाकूहल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान उपचारादरम्यान या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. 

ठाणे : ठाण्यात नवीन आरटीओजवळ दिवसाढवळ्या कॉलेज तरुणीवर चाकूहल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान उपचारादरम्यान या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. 

ठाण्यात दुपारी 12 च्या सुमारास आरटीओ ऑफिसजवळ एका 22 वर्षिय तरूणीवर एका तरूणाने चाकू हल्ला केला. या हल्ल्यात ही मुलगी गंभीर जखमी झाली. हल्ला करून हा तरूण पसार झाला. या तरूणीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 22 वर्षांच्या या तरूणीवर हल्ला का केला ही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. प्राची विकास झाडे असे या तरूणीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचीही माहिती मिळते आहे. दरम्यान पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Web Title: knife attack on girl in thane girl died