साहित्यातील बदलाचे ज्ञान आवश्‍यक : मंगेश कर्णिक

साहित्यातील बदलाचे ज्ञान आवश्‍यक : मंगेश कर्णिक

मुंबई : साहित्याच्या दृष्टीने कोकण पुढारलेला आहे. कोकणातील लेखकांची कविता-कथा वेगळी असते; त्या साहित्याला पर्यावरण आणि निसर्गाचा किनारा असतो. आता साहित्याचा परिघ बदलत असल्याचे ज्ञान साहित्यिकांना हवे. गोष्ट ऐकायला आवडणे हे कथेचे सामर्थ्य असल्याचेही भान कथाकारांना हवे, असे मार्गदर्शन ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी केले.

कोकण मराठी साहित्य परिषद, ग्रंथाली व मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय यांच्या वतीने सुरेश खेडेकर यांच्या ‘डोहमृग’ या कथासंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात झाले. या समारंभाला कोमसापच्या कार्याध्यक्ष नमिता कीर, ग्रंथालीचे विश्‍वस्त सुदेश हिंगलासपूरकर, प्रा. पंढरीनाथ रेडकर, अल्पना कशाळकर, एकनाथ आव्हाड व अन्य मान्यवर उपस्थित होते. खेडेकर यांचा ७५ वा वाढदिवस कुटुंबीयांसह साजरा करण्यात आला. या वेळी कवयित्री गौरी कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन मनोजन धुरंधर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com