कोल्हापूर ते राजकोट विशेष वन-वे फेरी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वे प्रशासनाने कोल्हापूर ते राजकोट एक विशेष फेरीची घोषणा केली आहे. 5 डिसेंबर रोजी सकाळी 11.45 वाजता कोल्हापूर टर्मिनस वरून ही विशेष ट्रेन सुटणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी 11.55 वाजता राजकोट पोहचणार आहे.

मुंबई : छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर ते राजकोट एक विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. ही फेरी वन-वे असणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वे प्रशासनाने कोल्हापूर ते राजकोट एक विशेष फेरीची घोषणा केली आहे. 5 डिसेंबर रोजी सकाळी 11.45 वाजता कोल्हापूर टर्मिनस वरून ही विशेष ट्रेन सुटणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी 11.55 वाजता राजकोट पोहचणार आहे.

या दरम्यान मिरज, सातारा, पुणे, लोणावळा, कल्याण, वसई रोड, सूरत, वडोदरा, अहमदाबाद या रेल्वे स्थानकावर या विशेष रेल्वेचा थांबा देण्यात आला आहे. यासाठी विशेष शुल्क आकारण्यात येणार आहे. महत्वाचं म्हणजे सामान्य द्वितीय श्रेणी डब्बे अनारक्षित पद्धतीने चालवण्यात येणार आहे.

Web Title: Kolhapur to rajkot train start