२२ वर्षांनंतरही पुनर्वसन नाही

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

मुंबादेवी - आम्ही अतिक्रमण कुठे केले? आम्ही ब्रिटिश काळ म्हणजे १०० वर्षांपासून गिरगाव चौपाटी बंदरात राहत होतो. येथील कोळी समाजाचे आम्ही भूमिपुत्र आहोत. बिर्ला क्रीडा केंद्राच्या मागे आम्हाला हलवण्यात आले आहे. २२ वर्षांनंतरही आमचे पुनर्वसन झालेले नाही. पुनर्वसन करून आमचा हक्क आम्हाला द्यावा, अशी मागणी गिरगाव चौपाटी नाखवा संघाच्या हिरालाल नाखवा यांनी नुकतीच मुंबई मराठी पत्रकार संघात केली.

१९९६ मध्ये मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस देऊन कोळीवाडा पाडला. त्यानंतर २००१ च्या रिट याचिकेनुसार न्यायालयाने १६ मार्च २००१ रोजी या मच्छीमारांचे पुनर्वसन करून, १५ दिवसांच्या नोटिशीनंतर स्थलांतराचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. 

न्यायालयाचा आदेश अजूनही पाळलेला नाही. मूळ जागा देण्याची मागणी चित्रपट अभिनेते व स्थानिक भूमिपुत्र जयंत वाडकर यांनी येथील कोळी बांधवांच्या वतीने केली आहे.
 
Web Title: Koli community has not rehabilitated even after 22 years