ठाणे-बेलापूर मार्गावर कोंडी 

ठाणे-बेलापूर मार्गावर कोंडी 


वाशी : ठाणे-बेलापूर मार्गावरील रबाळे टी जंक्‍शनजवळ नवी मुंबई पालिकेच्या माध्यमातून कळवटचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे ऐरोली नॉलेज पार्क रस्तामार्गे अवजड वाहनांची वाहतूक वळविण्यात आली आहे. यामुळे ठाणे-बेलापूर मार्गावर आज (ता.१४) सायंकाळी वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीचा मनस्ताप सायंकाळी कामावरून सुटणाऱ्या चाकरमान्यांना झाला. त्यामुळे वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे.
रबाळे टी जंक्‍शनजवळ दर वर्षी पावसाळ्यात पाणी साचत असल्यामुळे तेथील रस्त्याना खड्डे पडले होते. त्यामुळे पालिकेने या रस्त्याचे काम हाती घेतले हाती घेतले आहे. त्यामुळे वाशीकडून मुंबईकडे जाणारी अवजड वाहने ऐरोली नॉलेज पार्क रस्त्यामार्गे वळवण्यात आली होती. त्याचप्रमाणे मुंबईकडून येणारी वाहने ऐरोली नॉलेज पार्कमार्गे घणसोलीकडे वळवण्यात आली आहेत. गुरुवारी कामाचा दिवस असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली होती. ठाण्याकडून वाशीकडे जाणाऱ्या मार्गावर भारत बिजलीपासून एक किलोमीटर वाहनांची रांग लागली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com