esakal | कोकण रेल्वे प्रवासी संघाचा रेल-रोको आंदोलनाचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

कोकण रेल्वे प्रवासी संघाचा रेल-रोको आंदोलनाचा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : गणेशोत्सवासाठी कोकणात (Kokan) जाणाऱ्या नोकरदारांच्या मार्गात राज्य सरकारने आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी अहवाल वा दोन लस (Tow Dose) घेतल्याचे प्रमाणपत्र (Cetificate) बाळगण्याची अट घातली आहे. त्याला कोकण रेल्वे (Kokan Railway) प्रवासी सेवा संघाने विरोध दर्शविला आहे. येत्या चार दिवसांत सरकारने गणेशभक्तांना नियमात मुभा न दिल्यास ६ सप्टेंबरला (September) रेल रोको (Rail Rokho) करण्याचा इशारा दिला आहे.

कोकणात जाण्यासाठी नोकरदार सज्ज झाले आहेत. गतवर्षी कोरोनामुळे जाता आले नाही. त्यामुळे यंदा कोरोना काहीसा ओसरू लागल्यानंतर अनेकांनी तीन महिने आधीच रिल्वेचे आरक्षण केले. त्यामुळे यंदा गणेशोत्सवाला कोकणात गावी जाता येणार अशा आनंदात असतानाच २३ ऑगस्ट रोजी राज्य सरकारने नव्या अटी व नियम लागू केले आहेत.

कोकणात जाणाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र आणि लशीच्या दोन मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केल्याने कोकणवासीयांच्या आनंदावर पुन्हा विरजण पडले आहे.

हेही वाचा: येरवडा कारागृहात हलविण्याचा ब-हाटेचा अर्ज फेटाळला

सध्या बऱ्यापैकी कोरोना नियंत्रणात आहे. तेव्हा यंदा तरी अटी नियमांमध्ये शिथिलता देऊन कोकणचा प्रवास सुरळीत करण्याची मागणी कोकण रेल्वे प्रवाशी सेवा संघाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन पाठवून केली होती. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाने हे प्रकरण मदत व पुनर्वसन खात्याकडे वर्ग करून टोलवाटोलवी सुरु केल्याचा आरोपही कोकण रेल्वे प्रवाशी संघाने केला आहे.

या पत्रकार परिषदेला कोकण रेल्वे प्रवासी संघाचे पदाधिकारी राजू कांबळे, सुजित लोंढे, दर्शन कासले, संभाजी ताम्हणकर आदी उपस्थित होते..

loading image
go to top