कोकण विशेष गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

मुंबई - होळीनिमित्त मध्य रेल्वेने कोकणमार्गावर सोडलेल्या जादा गाड्यांचा प्रवाशांना फायदा होण्याऐवजी त्रासच झाला. या विशेष गाड्या सायडिंगला टाकल्याने चाकरमानी होळीला वेळेवर पोचू शकले नाहीत. 

मुंबई - होळीनिमित्त मध्य रेल्वेने कोकणमार्गावर सोडलेल्या जादा गाड्यांचा प्रवाशांना फायदा होण्याऐवजी त्रासच झाला. या विशेष गाड्या सायडिंगला टाकल्याने चाकरमानी होळीला वेळेवर पोचू शकले नाहीत. 

मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभारामुळे जादा गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. सीएसटी-मडगाव विशेष गाडी रविवारी (ता. 12) रात्री 11.55 वाजता सुटणे अपेक्षित होते, पण मडगावहून निघालेल्या या गाडीला चार तास उशीर झाल्याने परतीच्या गाडीलाही फटका बसला. त्यामुळे रात्री 11.55 वाजताची गाडी (01089) पहाटे 4.30 वाजता सुटली. पुढे ही गाडी सायडिंगला उभी करून अन्य गाड्यांना वाट करून दिल्याने प्रवाशांची होळी गाडीतच साजरी झाली. ही गाडी ओरोसला दुपारी 12 पर्यंत पोचणे अपेक्षित होते; ती गाडी दुपारी चार वाजता पोचली.

Web Title: konkan special train timetable