इंजिनमधील बिघाडामुळे 'कोकणकन्या'चा खोळंबा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

मुंबई - कोकणकन्या एक्‍स्प्रेसच्या इंजिनामध्ये दोन वेळा बिघाड झाल्याने कोकणकन्या एक्‍स्प्रेसला तब्बल तीन तासांचा विलंब झाला. नाहक ताटकळत राहावे लागल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

मुंबई - कोकणकन्या एक्‍स्प्रेसच्या इंजिनामध्ये दोन वेळा बिघाड झाल्याने कोकणकन्या एक्‍स्प्रेसला तब्बल तीन तासांचा विलंब झाला. नाहक ताटकळत राहावे लागल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी टर्मिनस-मडगाव ही कोकणकन्या एक्‍स्प्रेस दररोज रात्री 11.10 वाजता सुटते. सीएसटीहून ही गाडी वेळेत सुटत असली तरी कोकण गाठेपर्यंत या गाडीला विलंब होत असल्याच्या तक्रारी काही दिवसांपासून वाढल्या आहेत. मंगळवारी (ता. 21) ही गाडी वेळेतच सुटली. पण दोन वेळा इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे वेळापत्रक कोलमडले. इंजिनातील बिघाडामुळे भांडूप स्थानकाजवळ दीड तास गाडी थांबली. पुढे, दिवा स्थानकात इंजिन बदलले गेले. मात्र ते बदलण्यासाठी दीड तास लागला. त्यामुळे वेळापत्रक विस्कळित झाले. प्रवाशांसह एक्‍स्प्रेसच्या चालकांना जादा तासांचा फटका सहन करावा लागला. इंजिनमधील बिघाडामुळे गाडीला उशीर झाला. इतरवेळी ती वेळेतच असते, असा दावा मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी केला.

Web Title: konkankanya express engine problem