बेकायदा झोपड्यांवर कोपरखैरणेत कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

कोपरखैरणे - नवी मुंबई महापालिका आणि सिडकोने संयुक्त कारवाई करत कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसरातील 250 बेकायदा झोपड्या पाडल्या.

कोपरखैरणे - नवी मुंबई महापालिका आणि सिडकोने संयुक्त कारवाई करत कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसरातील 250 बेकायदा झोपड्या पाडल्या.

या मोहिमेत महापालिकेने रुग्णवाहिका, अग्निशामक दलाची मदत घेतली. कारवाईवेळी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी 50 पोलिस तैनात करण्यात आले होते. पावसाळ्यापूर्वी झोपडपट्टीवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाते, मात्र नंतर ही कारवाई थांबते. यापूर्वीही येथे कारवाई झाली होती परंतु, पुन्हा झोपड्या उभ्या राहिल्या. त्यामुळे परिसरात तात्पुरते सुरक्षा कठडे बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती सिडकोच्या अतिक्रमण विभागाने दिली.

Web Title: koparkhairane mumbai news crime on illegal slum