नवी मुंबईत मुलीवर वडिलांकडून बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

कोपरखैरणे - बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना नवी मुंबईतील कोपरी गावात उघडकीस आली आहे. पोटच्या मुलीचे वारंवार लैंगिक शोषण केल्याने अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून एपीएमसी पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे.

वाशी, सेक्‍टर 26, कोपरी गावात 13 वर्षांची पीडित मुलगी आई-वडिलांसोबत राहते. आई घरकाम आणि वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. आरोपीला दारूचे व्यसन आहे. दारूच्या नशेत त्याने मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. आई किंवा इतर कुणाला याबाबत न सांगण्याची तिला धमकीही दिली. त्यामुळे मुलीने आईला सांगण्याचे धाडस केले नाही. दोन दिवसांपूर्वी मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला डॉक्‍टरांकडे नेण्यात आले. तेव्हा डॉक्‍टरांनी तिला तपासून ती गर्भवती असल्याचे सांगितले. आईने तिला विचारल्यावर वडिलांचे हे कृत्य उघड झाले. मे महिन्यापासून वीस वेळा आरोपीने मुलीवर अत्याचार केले. अखेर मुलीच्या आईने पोलिसांत धाव घेऊन बुधवारी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Web Title: koparkhairane mumbai news girl rape by father