'जिओ'चा डेटा हॅक करणाऱ्या तरुणाला राजस्थानमधून अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

कोपरखैरणे - रिलायन्स "जिओ' कंपनीच्या हजारो ग्राहकांचा डेटा (व्यक्तिगत माहिती) हॅक करून संकेस्थळावर टाकणाऱ्या हॅकरला अखेर नवी मुंबई पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आहे. मुंबई सायबर सेलच्या मदतीने पोलिसांनी इम्रान चिंपाज (वय 24) याला अटक केली. त्याच्या चौकशीतूनच आणखी माहिती उपलब्ध होऊ शकेल, अशी माहिती पोलिस सहआयुक्त प्रशांत बुरडे यांनी दिली.

"जिओ'च्या ग्राहकांचा डेटा हॅक करण्यात आल्याची माहिती कंपनीच्या निदर्शनास आल्यानंतर व्यवस्थापक मनीष कच्छी यांनी पोलिसांकडे 10 जुलैला तक्रार दिली होती. त्यानंतर हा तपास नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे वर्ग करण्यात आला होता. रिलायन्सच्या हजारो ग्राहकांचा डेटा चोरीला गेल्यामुळे पोलिसांपुढे आव्हान होते. याबाबत मुंबई सायबर सेलची मदत घेण्यात आली. राज्य पोलिसांच्या सायबर सेलचे उपमहानिरीक्षक ब्रिजेश सिंग यांनी तज्ज्ञांना घेऊन वेगाने तपास सुरू केला.

तपासात "मॅजिकएपीके' संकेतस्थळावरून जिओचा डेटा हॅक केल्याचे उघड झाले. राजस्थानातील इम्रान चिंपाज (वय 24) याने हे संकेतस्थळ तयार केले असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्याला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. त्याचा ताबा नवी मुंबई पोलिस घेणार आहेत. त्याला स्थानिक न्यायालयाच्या परवानगीने गुरुवारपर्यंत नवी मुंबईत आणले जाईल. त्यानंतर आरोपीने चोरलेला डेटा कुठे चुकीच्या पद्धतीने वापरला आहे का, याबाबत समजू शकेल, अशी माहिती सहआयुक्त प्रशांत बुरडे यांनी दिली.

Web Title: koparkhairane mumbai news youth arrested jio hack