पोलिस उपनिरीक्षकाकडून अडीच लाखांची लाच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

कोपरखैरणे - सीबीडी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षकाला अडीच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. तक्रारदाराच्या भावाला कमी दिवसांची पोलिस कोठडी मिळण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. सीबीडी पोलिसांनी वाहनचोरी प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. ते प्रकरण सहायक पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील वाघमारे हाताळत होते. या आरोपीला कमी दिवसांची पोलिस कोठडी व मदत करण्यासाठी वाघमारे याने अडीच लाखांची लाच मागितली. या प्रकरणी आरोपीच्या चुलत भावाने ठाणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री सापळा रचून वाघमारेला लाच घेताना पकडण्यात आले.
Web Title: koparkhairane news police office bribe