दोन हजारांची लाच घेताना कोतवाल ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 डिसेंबर 2018

महाड : सात-बारावर वारसाची नोंद करण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी करणाऱ्या कोतवालास लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रंगेहाथ पकडले. यामुळे महाड महसूल कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड झाला आहे. जगदीश लक्ष्मण साळवी असे कोतवालाचे नाव आहे.

वडिलोपार्जित मिळकतीच्या सात-बारावर वारस नोंद करून देण्यासाठी त्याने तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक विवेक जोशी यांनी महाड तहसील कार्यालयाबाहेर सापळा रचून लाचेची रक्कम स्वीकारताना साळवी यास रंगेहाथ पकडले. महाड तालुक्‍यात यापूर्वी तीन मंडल अधिकारी व एक तलाठी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडला आहे.

Web Title: Kotwal detained for accepting bribe of two thousand