पारसी अग्यारीवर मेट्रोमुळे परिणाम?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

मुंबई - कुलाबा-वांद्रे-सिप्झ भूमिगत मेट्रो-३ च्या सध्या सुरू असलेल्या कामामुळे दोन पुरातन पारसी अग्यारींच्या बांधकामावर परिणाम होऊ शकतो का? अशी विचारणा करत त्यावर तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची सूचना उच्च न्यायालयाने एमएमआरसीएला केली आहे. 

पारसी समुदायाच्या याचिकांवर तत्काळ सुनावणी घेण्यासाठी एमएमआरसीएने केलेल्या अर्जावर न्या. अभय ओक आणि न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. ३३.५ किलोमीटरच्या भूमिगत मेट्रो-३ साठी दोन अप आणि डाऊन बोगदे तयार करण्याचे काम सध्या सुरू आहेत. त्यातील एक बोगदा काळबादेवी आणि प्रिन्सेस स्ट्रीट परिसरात असलेल्या दोन अग्यारींच्या अगदी जवळून जाणार आहे. त्यामुळे अग्यारींच्या बांधकामावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्याचा मार्ग बदलावा, अशी मागणी पारसी समुदायाच्या संघटनांनी केली आहे. त्याची दखल न्यायालयाने घेतली आहे.

Web Title: kulba-Bandra-Seepz Underground Metro-3