संजय राऊत आणि कुणाल कामरा यांची भेट, सोशल मीडियावर फोटो शेअर

पूजा विचारे
Monday, 5 October 2020

स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा शिवसेनेचे खासदार आणि 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांची मुलाखत घेणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊत चर्चेत आहेत.

मुंबईः स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा शिवसेनेचे खासदार आणि 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांची मुलाखत घेणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊत चर्चेत आहेत. अशातच कुणाल कामरानं ‘शट अप या कुणाल’ पॉडकास्टच्या दुसऱ्या सत्राची सुरूवात संजय राऊत यांच्या मुलाखतीनं करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार आता कुणालची ही इच्छा पूर्ण झाली आहे. कुणाल आणि संजय या दोघांनीही आपल्या भेटी दरम्यानचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

संजय राऊत यांनी हा फोटो शेअर करत त्याला कॅप्शन दिलं की, आज कुणाल कामराला ('मेट कुणाल कामरा टुडे') भेटलो. तर  इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करताना कुणाल कामराने 'शट अप या कुणाल 2.0' असं कॅप्शन दिलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Shut up ya kunal 2.0

A post shared by Kamra (@kuna_kamra) on

कुणाल कामराचं  निमंत्रण  स्विकारल्यानंतर रविवारी दोघांची भेट झाली. या भेटी दरम्यान दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. येत्या शुक्रवारी या पॉडकास्ट मुलाखतीचं शुटिंग पार पडणार आहे. 

काही दिवसांपूर्वी कुणाल कुमारानं एक ट्विट केलं होतं की, संजय राऊत सरांनी ‘शटअप या कुणाल’ या पॉडकास्टच्या दुसऱ्या पर्वाचे पहिले पाहुणे म्हणून सहभागी होण्याची तयारी दर्शवली, तरच मी ते पुन्हा सुरु करेन. अन्यथा काही शक्यता नाही.  त्यानंतर संजय राऊत यांनीही कुणालचं निमंत्रण स्वीकारलं.

स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने रमित वर्मासह 2017 मध्ये 'शट अप या कुणाल'ची सुरुवात केली होती. या शोमध्ये आतापर्यंत  शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, जेएनयू विद्यार्थी नेता कन्हैया कुमार आणि उमर खलिद, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी, गीतकार जावेद अख्तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार, काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा, सचिन पायलट यांसह अनेक मोठी मंडळी सहभागी झाले आहेत.

kunal kambra meet sanjay raut Shut up ya kunal Show interview share photo


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kunal kambra meet sanjay raut Shut up ya kunal Show interview share photo