मोदीजी, मी चालू तरी शकतो का? का त्यावरही बंदी घातली? - कुणाल कामरा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

मुंबई - कॉमेडियन कुणाल कामरावर इंडिगोने केल्या कारवाईनंतर आता एअर इंडिया आणि स्पाईस जेट अशा एकूण तीन कंपन्यांनी बंदी घातलीय. कॉमेडियन कुणाल कामरा याने पत्रकार अर्णब गोस्वामी यांना इंडिगोच्या विमानात डिवचण्याचा व्हिडीओ टाकल्यानंतर कुणाल कामरावर इंडिगोने सहा महिन्यांची बंदी घातली आहे. इंडोगोच्या बंदीनंतर एअर इंडियानेदेखील कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विमान प्रवासावर पुढील सूचना येईपर्यंत बंदी घातली आहे. 

मुंबई - कॉमेडियन कुणाल कामरावर इंडिगोने केल्या कारवाईनंतर आता एअर इंडिया आणि स्पाईस जेट अशा एकूण तीन कंपन्यांनी बंदी घातलीय. कॉमेडियन कुणाल कामरा याने पत्रकार अर्णब गोस्वामी यांना इंडिगोच्या विमानात डिवचण्याचा व्हिडीओ टाकल्यानंतर कुणाल कामरावर इंडिगोने सहा महिन्यांची बंदी घातली आहे. इंडोगोच्या बंदीनंतर एअर इंडियानेदेखील कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विमान प्रवासावर पुढील सूचना येईपर्यंत बंदी घातली आहे. 

त्याच झालं असं की कुणालने इंडिगोच्या बंदीवर प्रतिक्रिया देताना ट्विटमध्ये इंडिगोचे आभार मानलेत. याचसोबत त्याने  यांच्यावर देखील निशाणा साधला. इंडिगोने सहा महिन्यांची बंदी घातलीय, मात्र 'नरेंद्र मोदीतर एअर इंडियावर कायमस्वरुपी बंदी आणत आहेत' असं ट्विट केलं होतं. दरम्यान अगदी काहीच वेळात एअर इंडियाने याबाबत दखल घेत पुढील सूचना येईपर्यंत कुणाल कामरा यावर बंदी घातलीय. अशात पुन्हा एकदा कुणालने ट्विट केलंय आणि एअर इंडियावर निशाणा साधलाय.   

मोठी बातमी - "कोरेगाव भीमात हिंसाचार व्हावा हे पुनर्नियोजित होतं"      

 

मोठी बातमी -  आता शिवभोजन थाळी येणार थेट तुमच्या दारी..

दरम्यान एअर इंडियाकडून घालण्यात आलेली बंदी अनपेक्षित असल्याचं कुणाल म्हणालाय. ‘तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का’ या शब्दात  कुणालने एअर इंडियाच्या बंदीच्या ट्विटला उत्तर दिलं आहे. 

याबाबत लिहिताना, “एकदा एअर इंडियाने जाताना माझ्याकडील ‘लगेज’चं वजन चार किलोग्रॅम जास्त भरलं होतं,  एअर इंडियाचं वजन करण्याचं मशिन बंद बंद होतं आणि माझ्याकडे रोख पैसे नव्हते. कर्मचारी  मला जाऊद्या म्हणाला. मात्र तुमची कंपनी तोट्यात आहे, मी पैसे देऊन जाईन असं मी त्यांना म्हणालो. पैसे देण्याची पर्यायी व्यवस्था करेपर्यंत मी थांबलो होतो. मात्र अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का” असं ट्विट कुणालने केलंय.

बरं प्रकरण इथवरच थांबत नाहीये. आता स्पाईसजेटने सुद्धा कुणाल कामरावर बंदी घातली आहे. यावरही कुणालने मजेशीर उत्तर देत पुन्हा नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. 'मोदीजी, आता मी चालायचं की नाही ? का त्यावरही बंदी आहे' असं कामरा म्हणालाय.   

मोठी बातमी - गुजरातमधून येणारा 'हा' पदार्थ तुम्हाला आजारी पाडू शकतो...

 

दरम्यान सर्व प्रकारावर आता  कुणालने एक स्पष्टीकरण देखील दिलं आहे. माझ्यावर एकूण तीन विमान कंपन्यांकडून काही कालावधीसाठी बंदी घालण्यात आली आहे. माझ्यासोबत असं पहिल्यांदाच घडतंय. इंडिगोबद्दल जाऊद्या, मात्र एअर इंडिया आणि स्पाईस-जेट मधून मी प्रवासदेखील केला नव्हता. तरीही माझ्यावर बंदी घालण्यात आली आहे. माझ्या विमान प्रवासादरम्यान मी विमान प्रशासनाच्या सगळ्या गोष्टी पाळल्या आहेत, मी कोणत्याही सहप्रवाश्याचा जीव धोक्यात घातलेला नाही. माझी चूक एवढीच आहे कि मी पत्रकार अर्णब गोस्वामी यांचा फुगलेला अहंकार दुखावला. या आधी मी स्पाईसजेट किंवा एअर इंडियातून प्रवास केलाय. माझी कोणतीही तक्रार या आधी झालेली नाही,अशी प्रतिक्रिया कुणालने दिली आहे. या व्यतिरिक्त कुणाल काय म्हणालाय वाचा. 

 

दरम्यान आता कुणाल कामरा यावर घालण्यात आलेल्या बंदीचा अनेकांकडून निषेध देखील केला गेलाय.  

kunal kamra banned by spice jet after banned by indigo and air india gives his clarification bye tweet


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kunal kamra banned by spice jet after banned by indigo and air india gives his clarification bye tweet