मुरबाड मध्ये कुणबी समाज उन्नती मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मुरलीधर दळवी
रविवार, 19 ऑगस्ट 2018

मुरबाड (ठाणे) : विविध प्रकारच्या परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या कुणबी समाजातील विद्यार्थ्यांचा मुरबाड तालुका कुणबी स्मजोन्नती मंडळातर्फे रविवारी (ता. 19) मुरबाड येथील कुणबी भवना मध्ये सत्कार करण्यात आला 

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार गोटीराम पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दिगंबर विशे, ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, सदस्य सुभाष घरत, उल्हास बांगर, मुरबाडच्या उप नगराध्यक्ष अर्चना विशे, पंचायत समितीचे माजी सदस्य अनंत कथोरे, कुणबी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष गणपत विशे उपस्थित होते.

कुणबी समाजातील एमपीएस्सी परीक्षा उत्तीर्ण डॉक्टर, वकील, इंजिनिअर, सीए, तसेच पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला एमपीएस्सी परीक्षेत सहायक मोटर निरीक्षक म्हणून निवड झालेल्या भाग्यश्री आवार यांचेसह काही सत्कार मूर्तींनी मार्गदर्शन केले यावेळी कुणबी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष गणपत विशे यांनी सूत्रसंचालन रमेश तुंगार व शरद चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन योगेंद्र बांगर यांनी केले

Web Title: kunbi samaj unnati mandal honored meritorious students in Murbad