कुर्ला भूखंड प्रकरण शिवसेनेवर शेकले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

मुंबई - कुर्ला येथील भूखंड प्रकरण शिवसेनेवर शेकले आहे. हा भूखंड वाचवण्यासाठी आक्रमक झालेल्या विरोधी पक्षांनी सुधार समितीचे अध्यक्ष दिलीप लांडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भूखंडप्रकरणी सभागृहात उपसूचना मांडणारे माजी सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांच्यावर कारवाई करावी, अशी जोरदार मागणीही विरोधी पक्षांनी सोमवारी (ता. 3) केली. हा भूखंड ताब्यात घेण्याबाबतचा प्रस्ताव 13 डिसेंबरपर्यंत पुन्हा सभागृहात आणला नाही; तर कामकाज चालू देणार नाही तसेच रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही विरोधी पक्षांनी दिला आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

शिवसेनेचे नगरसेवक आणि सुधार समितीचे माजी अध्यक्ष बाळा नर यांनी कुर्ला येथील उद्यानासाठी आरक्षित असलेला भूखंड खरेदी न करण्याबाबतची उपसूचना सभागृहात मांडली होती. या उपसूचनेला विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेत सभात्याग केला होता. परंतु, बहुमताच्या जोरावर शिवसेनेने ही उपसूचना मंजूर करून घेतली. उद्यानासाठी आरक्षित असलेला हा भूखंड षड्‌यंत्र करून बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. हे प्रकरण शेकणार हे लक्षात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सभागृह नेत्या विशाखा राऊत आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली. या प्रकरणात चूक झाली, भूखंडाबाबतचा प्रस्ताव पुन्हा सभागृहात आणला जाईल, असे स्पष्टीकरण देत शिवसेनेने घुमजाव केले. 

या मुद्द्यावरून आता विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी शिवसेनेचे बाळा नर आणि सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हा प्रस्ताव सभागृहात मांडण्यापूर्वी सुधार समितीच्या अध्यक्षांनी वाचला होता. सभागृह नेत्यांनाही प्रस्तावाबाबत माहिती असते, असे असताना नर यांनी उपसूचना मांडली व ती सभागृहात बहुमताने मंजूरही करण्यात आली. ही चूक कशी होऊ शकते, असा सवाल विरोधी पक्षनेते रवी राजा, सपचे गटनेते रईस शेख, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केला आहे. त्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन भूखंड प्रकरणी चौकशी करून कारवाईची मागणी केली. त्यामुळे हा मुद्दा आता चिघळत चालला असून, शिवसेना अडचणीत आली आहे. 

कुर्ला येथील या भूखंडाची बाजारभावाने किंमत तब्बल 600 कोटी रुपये आहे. हा भूखंड खरेदी करण्याचा प्रस्ताव सुधार समितीत मंजूर होऊनही अध्यक्ष दिलीप लांडे यांची भूमिका कशी बदलू शकते? हा भूखंड त्यांच्या विभागातील असल्याने त्यांनी भूमिका बदलली का? 
- रवी राजा, विरोधी पक्षनेते, मुंबई महापालिका 

Web Title: Kurla plot case shakes on Shiv Sena