अवघ्या 15 मिनिटात कापा कुर्ला स्टेशन ते BKC अंतर; 'हो' आता हे शक्य आहे..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

मुंबई आणि मुंबईतील 'बंपर टू बम्पर' ट्राफिक, त्यातही तुम्ही जर सकाळी किंवा संध्याकाळी कुर्ला स्टेशन ते BKC या भागातून प्रवास करत असाल तर तुम्ही ट्राफिकने बेहाल होण्याशिवाय काहीच पर्याय नाही. तुमचा सधारण एक तास गेलाच म्हणून समजा. पण आता तुमचा कुर्ला स्टेशन ते BKC प्रवास सुखकर होण्याच्या मार्गावर आहे.

शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींची तरतूद; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पैसे

कुर्ला स्थानक ते BKC  (वांद्रे कुर्ला संकुल) यांच्यातलं अंतर पार करण्यासाठी लागणारं १ तासाचं अंतर आता अवघ्या 15 मिनिटावर येणार आहे. कुर्ला स्थानक ते BKC दरम्यान शंभर वर्ष जुनी डेविड चाळ आहे. आता ही जुनी चाळ पाडली जाणार असल्यानं या भागातून प्रवास करणं आता सुलभ होणार आहे. या चाळीतील रहिवाशांना  नजीकच्या  SRA इमारतीत पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवर काय म्हणाल्या 'मिसेस मुख्यमंत्री'?

ही चाळ पाडून आता रस्त्याच रुंदीकरण केलं जाणार आहे. त्यामुळे इथल्या वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.  'कुर्ल्याला उतरणाऱ्या किंवा तिथून ट्रेन पकडणाऱ्यांची संख्या 30 लाखांच्या घरात आहे. यातील अनेकजण बीकेसी, वांद्रे किंवा खारला जातात. वाहतूक कोंडीमुळे हा प्रवास अतिशय त्रासदायक ठरतो,' त्यामुळे आता डेविड चाळ हटवल्यानंतर प्रवास वेगवान होईल असा विश्वास एल विभागाचे सहाय्यक आयुक्त मनिष वळंजू यानी व्यक्त केलाय.

धक्कादायक! व्हॉट्‌सऍपद्वारे भारतीयांवर ठेवली जातेय पाळत

Webtitle : kurla station to BKC distance travel time reduced to 15 minutes

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kurla station to BKC distance travel time reduced to 15 minutes