अन् त्याच्या ऑक्सिमीटरनं दर्शवली चक्क पेन्सिलची ऑक्सिजन पातळी

पूजा विचारे
शुक्रवार, 31 जुलै 2020

या ऑक्सिमीटरमधून एका पेन्सिलची ऑक्सिजनची पातळी तपासण्यात आली.  पेन्सिलची ऑक्सिजन पातळी आणि हर्ट रेट दोन्ही दर्शवण्यात आले.

मुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. अशातच अंधेरीत राहणाऱ्या एका व्यक्तीनं ऑक्सिमीटर खरेदी केले. त्यानं आपल्या कुटुंबियातील व्यक्तीची ऑक्सिजनची पातळी तपासण्यासाठी हे ऑक्सिमीटर खरेदी करण्या मागचा हेतू होता. पण या ऑक्सिमीटरमधून एका पेन्सिलची ऑक्सिजनची पातळी तपासण्यात आली.  पेन्सिलची ऑक्सिजन पातळी आणि हर्ट रेट दोन्ही दर्शवण्यात आले. त्यानंतर त्याला धक्काच बसला. कुशल धुरी, हे एका राजकीय पक्षासाठी काम करतात. कुशल हे चीन निर्मित उपकरणानं चांगलेच संतापलेत. या प्रकारानंतर कुशल यांनी प्रतिक्रिया दिली की,  लोकांनी चीनमध्ये बनविलेले ऑक्सिमीटर खरेदी करणे बंद केले पाहिजे. 

डॉक्टरांनी वर्षानुवर्षे पल्स ऑक्सिमीटर वापरला आहे. सध्या कोरोनाच्या व्हायरसच्या काळात सामान्य माणसांनी देखील ऑक्सिमीटर विकत घेत असल्यानं त्याला बाजारात मोठी मागणी दिसून आली आहे. या मागणीमुळे बाजारात या डिव्हाइसचा तुटवडाही जाणवू लागला होता. त्यानंतर बऱ्याच नवीन कंपन्यांनी त्याची विक्री सुरु केली आणि सध्या बऱ्याच ई-कॉमर्स वेबसाइटवर त्या ऑनलाइन विकल्या जात आहेत. 

हेही वाचाः उद्योगपती आनंद महिंद्राही भारावले; 'त्या' दाम्पत्याला केली 4 लाखांची मदत

'माझी पेन्सिलही घेते श्वास' 

धुरी म्हणाले की, ऑनलाइन आणि बाजारात वैद्यकीय उपकरणांच्या नावाखाली अनेक अविश्वसनीय चिनी वस्तू विकल्या जाताहेत. ही उपकरणे लोकांच्या जीवाशी खेळत असल्यामुळे यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. मी लोकांना आवाहन करू इच्छित आहे की, चीननं बनवलेले ऑक्सिमीटर खरेदी करणं थांबवा कारण मी विकत घेतलेल्या ऑक्सिमीटरमधून पेन्सिलच्या हृदयाचा ठोका आणि ऑक्सिजनचा स्तर दिसून येतोय.

अधिक वाचाः पनवेलकरांना मोठा दिलासा; सिडकोतर्फे उभारण्यात येणार कोव्हिड रुग्णालय... 'इतक्या' कोटींचा निधी झाला मंजूर

 धुरींनं या ऑक्सिमीटरमध्ये एक साधा लाकूड ठेवला आणि आर्श्चयाची गोष्ट म्हणजे, या उपकरणानं लाकडाचंही ऑक्सिजनची पातळी दर्शवली. १५ दिवसांपूर्वी धुरी यांनी हे ऑक्सिमीटर १,८०० रुपयांना विकत घेतला. त्यांच्या सोसायटीमधील एका व्यक्तीनं हे ऑक्सिमीटर विक्रीसाठी त्यांच्याशी संपर्क साधला होता. साधारणपणे पल्स ऑक्सिमीटरची किंमत ८०० ते ४,००० रुपये असते.

Kushal Dhuri Oxymeter Shows Heartbeat Pencil mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kushal Dhuri Oxymeter Shows Heartbeat Pencil mumbai