मलंगगड : खाणीतील सुरुंग स्फोटाने कुशीवलीतील घरांना तडे

house breaks
house breakssakal media

डोंबिवली : मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या कुशीवली गावालगत असलेल्या दगड खाणीत सातत्याने (mining) सुरुंग स्फोट (mining explosion) केले जातात. शनिवारी झालेल्या स्फोटाने कुशीवली गावातील (kushivali village) 25 ते 30 घरांच्या भिंतींना, लाद्याना तडे गेले आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण (people fear) निर्माण झाले आहे. आक्रमक ग्रामस्थांनी ही खाण बंद करून त्याचा परवाना (license) रद्द करावा, तसेच ग्रामस्थांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तहसीलदारांना निवेदन देत केली आहे. दहा दिवसांत याची दखल घेण्यात आली नाही तर आंदोलनाचा इशारा (strike warning) ग्रामस्थांनी दिला आहे.

house breaks
काही काळ अज्ञातवासात असलेला तो परत येतोय स्वागताची कार्यकर्त्याकडून जय्यत तयारी

कल्याण ग्रामीण भागातील मलंगपट्ट्यात कुशीवली गाव वसलेले आहे. या भागात दगडखाणी मोठ्या प्रमाणात आहेत. अंबरनाथ तालुक्यालगत असलेल्या तनिष स्टोन क्रेशर प्रा.लि. कंपनी खाण उत्खननासाठी सुरुंग स्फोट करीत आहे. ही खाण कुशीवली वस्ती पासून काही अंतरावर आहे. खाणीतील स्फोटामुळे गावातील घरांचे नुकसान होते. तक्रार केल्यानंतर स्फोटाची तीव्रता कमी केले जाते. या स्फोटामुळे गावातील घरांतील भिंती, लाद्या यांना मोठं मोठ्या भेगा पडल्या आहेत. केवळ घरांनाच नाही तर रस्त्याला देखील तडे गेले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

शनिवारी 12 वाजुन 53 मिनिटांनी झालेल्या स्फोटाने तर गावातील 25 ते 30 घरांचे नुकसान झाले आहे. स्फोटाने उडणारे दगड लांबवर फेकले जात असल्याने ग्रामस्थांना ते लागण्याची भीती वाटते. स्फोटांनी आमची घरे खिळखिळी होत असून पावसाळ्याचे दिवस असल्याने घर पडेल का याचीही भीती वाटत असल्याचे ग्रामस्थ काशिनाथ म्हात्रे यांनी सांगितले. मौजे कुशिवली गावात पिढयानपिढया कुडांची घरे होती. गेल्या दोन वर्षात कुठे गावात आवास योजने अंतर्गत आयुष्याची जमा पुंजी घालत ग्रामस्थांना चांगली सिमेंटची घरे बांधता आली आहेत. मात्र ही घरे देखील आता जमीन दोस्त होण्याच्या मार्गावर आहेत.

आमदार गणपत गायकवाड यांनी गावात येऊन घरांच्या झालेल्या नुकसानीची पहाणी केली आहे. अंबरनाथ तहसीलदारांना निवेदन देत पहाणी करून पंचनामे करावे व ग्रामस्थांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच ती खाण बंद करून त्याचा परवाना रद्द करावा अशी आमची मागणी असल्याचे जगदीश म्हात्रे यांनी सांगितले. तसेच या निवेदनाची येत्या दहा दिवसांत दखल घेतली गेली नाही तर ग्रामस्थ आंदोलन करतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com