लोकल तिकिटासाठी महिलांच्या रांगाच रांगा; लोकलमध्ये गर्दी वाढली, नियोजनाचा बोजवारा

लोकल तिकिटासाठी महिलांच्या रांगाच रांगा; लोकलमध्ये गर्दी वाढली, नियोजनाचा बोजवारा

मुंबई: लोकलमध्ये महिलांना प्रवासाची मुभा मिळून तीन दिवस उलटून गेलेत. या निर्णयामुळे महिलांची तासंतास गर्दीत धक्के खात प्रवास करण्यापासून सुटका झाली. मात्र अत्यावश्यक सेवा वगळता इतर महिलांना रेल्वे पास मिळत नसल्यामुळे दररोज तिकीट काढण्याचे नवा त्रास त्यांच्या वाट्याला आला असून, त्यामुळे तिकीट खिडकीवर महिलांच्या रांगांच रांगा लागत असल्याचे चित्र आहे. 

लॉकडाऊन दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी दिली होती. या सर्व कर्मचाऱ्यांना क्युआर कोड आणि पासेस दिल्यामुळे रेल्वे स्टेशवर फारशी गर्दी नव्हती. मात्र सरसकट सर्व महिलांना प्रवासाचा निर्णय लागू केल्यामुळे आता गर्दीचे नियोजन विस्कटायला लागल्याचे चित्र आहे. ठराविक वेळेत प्रवासाचे बंधन आणि पास न मिळत असल्यामुळे, या महिला प्रवाशांना दररोज तिकीट काढाव्या लागतात त्यामुळे रांगेत उभे राहण्याचा जाच कायम असल्याची प्रतिक्रिया अनेक महिला प्रवाशांनी दिली आहे. महिलांची संख्या बघता, रेल्वेने तिकीट खिडक्या वाढवणे अपेक्षित होत, मात्र तसे होताना दिसत नाही. 

लोकलमध्ये महिला डब्यात आता गर्दी होऊ लागली आहे. पहिले सीटवर बसायला मिळायचे मात्र आता सकाळी 11 नंतर सीट मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेकांवर उभ्या उभ्या प्रवास करण्याची वेळ येत आहे. सकाळी 11 पासून प्रवासाची परवानगी मिळल्यामुळे तिकीट घेण्यासाठी सकाळी 10 पासून महिलांच्या रांगा लागतात. अनेक स्टेशनवर हे चित्र आहे. 

काही स्टेशनवर पास मिळत नसल्यामुळे आम्हाला रांग लावावी लागत आहे. 11 वाजता रांग लावून तिकीट काढून कामावर पोहोचायला उशीर होतो आहे. लॉकडाऊन नंतर सुरू झालेला हा रेल्वे प्रवास महिलांसाठी जिकरिचा आहे असं श्रावणी गावडे या महिला प्रवाशांनी म्हटलंय.

तर मुंबई रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष मधू कोटियन म्हणालेत, रेल्वेने निर्णय घ्यायला चार दिवस लावले, मात्र गर्दीचे नियोजन केले नाही. महिलांची संख्या किती आहे, गर्दी होणार आहे, रेल्वे स्टेशनवर तिकीट खिडक्या वाढवल्या पाहिजे. एव्हीटीएम तिकीट्स मशीन तयार ठेवायला पाहिजे होत्या. एवढ्या लॉकडाऊन काळात नियोजन करायला रेल्वेला पुरेसा वेळ होता. मात्र या गर्दीला सामोरे जाण्याची कोणतीही तयार रेल्वेने केली नाही हे दिसून येत आहे.

रेव्ले प्रवासी राजन म्हणतात, रेल्वे आता सुरू झाल्यापासून रोज प्रवास करते. सांताक्रुझ ते वांद्रे या प्रवासासाठी ही किमान अर्धा तास आधी निघावं लागतं. कारण, माझी दुपारची शिफ्ट असल्याने लवकर निघावं लागतं. पण, तिकीटासाठी ही किमान 20 मिनिट लाईनमध्ये उभं राहावं लागतं. ज्यातून सोशल डिस्टंसिंग पाळले जात नाही. 

ladies who are travelling by mumbai local trains are waiting in big queue for local train ticket

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com