नवरा, सासू-सासऱ्यांनी केली विष पाजून महिलेची हत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

वासिंद (ठाणे) : वासिंदजवळ साने गावात करुणा अशोक भोईर या महिलेचे नवरा सासू व सासरा यांनी विष देऊन तिचे जीवन संपवले.

वासिंद (ठाणे) : वासिंदजवळ साने गावात करुणा अशोक भोईर या महिलेचे नवरा सासू व सासरा यांनी विष देऊन तिचे जीवन संपवले.

फिर्यादी सदा वामन चोरघे (वडील, रा.गोवेली, कल्याण) यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूला कारण नवरा, सासू, सासरा असून 15 जुलैला मयत कल्पना चार वाजता विष पिऊन मृत झाली होती. वासिंद पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवलेली असून आरोपी अशोक सुखदेव भोईर (नवरा), बारकूबाई सुखदेव भोईर (सासू), तसेच सुखदेव कथोड भोईर (सासरा) तिन्ही आरोपी साने गावचे रहिवासी असून वासिंद पोलिस स्टेशनमध्ये तिन्ही आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून आय.सी.आर नंबर ७०/२०१८ , आय.पी.एस ४९८(अ) ,२०४(ब) ,३०६.३४ या अंतर्गत कलम लागलेले आहेत. कल्पना भोईर यांना त्यांचाकडे नवरा अशोक भोईर वारंवार पैशाची मागणी करत असे.

तसेच ग्रामपंचायतमध्ये घेतलेल्या टेंडरसाठी दहा लाख रुपये मागितले व मानसिक तसेच शारीरिक त्रास देऊन पैसे आणले नाहीत तर घरातून हाकलून देईल आणि जिवे ठार मारण्याची धमकी देत असे. त्यासाठी माहेरून तीन लाख आणून दिले व उर्वरित रकमेसाठी छळ करू लागला. पैशाची मागणी करून आरोपींनी संगनमताने तिचे दागिने विकून तिला त्रास दिला.

पुढील तपास पी.एस. आय. भांगरे हे करत आहेत. नमूद पोलीस स्टेशन डायरी चार्ज पो.हवा/मुठे  यांनी दिली. तसेच पोलिसांची टाळाटाळ करत असून तिन्ही आरोपींना अटक न झाल्यास वासिंद पोलिस  स्टेशन समोर आमरण उपोषण करू, असे नातेवाईकांनी सांगितले.

Web Title: a lady killed by husband mother and father in law by poison