Sakal Impact : 'लेक शिकवा अभियाना'चे नाव बदलले; वाचा सविस्तर

3 ते 12 जानेवारी दरम्यान 'जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा' अभियान
sakal impact
sakal impactsakal media

मुंबई : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दरम्यानच्या काळात यंदा शालेय शिक्षण विभागातर्फे (school education department) 'जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा' हे अभियान (Lake Abhiyan) राज्यात राबवले जाणार आहे. यासाठी आज शिक्षण विभागाने जीआर जारी केला (GR announced) आहे. (lake shikwa abhiyan name changed after sakal news publication)

sakal impact
मुंबई कोरोनाच्या विळख्यात; सात दिवसांत सात पटीने रुग्ण वाढ!

'सकाळ'मध्ये बुधवारी, 29 डिसेंबर रोजी ' यंदा तरी लेक शिकवा अभियान राबविण्यात येणार का ' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते, त्याची शिक्षण विभागाने तात्काळ दखल घेत आज घाई गडबडीत जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा हे अभियान राबविण्याचा जीआर काढला आहे. या जीआरनुसार राज्यातील प्रत्येक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 3 जानेवारी ते 12 जानेवारी या कालावधीत हे अभियान राबवले जाणार आहे.

मागील सात वर्षांपासून शालेय शिक्षण विभागाकडून सावित्रीबाई फुले यांच्या 3 जानेवारी या त्यांच्या जयंतीपासून ते भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी या कालावधीत 'ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान' राबवले जात होते, त्याचे नाव बदलून आता 'जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा' हे अभियान राबविण्यात येणार आहे. मात्र या नव्या अभियानात लेक शिकवा आणि त्यातून शाळाबाह्य मुलींचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या मुख्य उद्देशाला हरताळ फासत हे अभियान केवळ कार्यक्रमापुरते मर्यादित करण्यात आल्याने यावर शिक्षण तज्ञ आणि स्वयंसेवी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

sakal impact
मुंबई कोरोनाच्या विळख्यात; सात दिवसांत सात पटीने रुग्ण वाढ!

कोरोनाच्या महामारीनंतर राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात मुलींची शाळा सुटली. यामुळेच बालविवाह मोठ्या प्रमाणात झालेले असल्याने शाळाबाह्य मुलींचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हे नवीन अभियान आवश्यक होते, मात्र तसे न झाल्याने ज्येष्ठ शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी, समर्थन संस्थेचे शिक्षण प्रमुख रुपेश किर, सिस्कॉम संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र धारणकर आदीनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियानाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांमध्ये आता जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा' हे अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी आज जीआर जारी करण्यात आला आहे. यात शाळाबाह्य मुलींचा शोध घेणे व त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे अशा काही त्रुटी राहिल्या असतील तर त्यावर नव्याने विचार केला जाईल.

- राजेंद्र पवार, सहसचिव शालेय शिक्षण

नवीन अभियानाचे उद्देश

राज्यातील शाळांमध्ये प्रबोधन, स्पर्धा, संवाद आणि त्यासोबत विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. जिजाऊ आणि सावित्री या महान स्त्रियांच्या कर्तृत्वाचा व व्यक्तिमत्त्वाचा आदर्श घेऊन आजच्या मुलींनी आपल्या जीवनाची वाटचाल केल्यास सक्षम, स्वावलंबी आणि धाडसी समाज निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल. त्यामुळे अगदी यांच्या विचारांची आणि कार्याची समग्र ओळख करून देणे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती 3 जानेवारी रोजी असते, त्या दिवशी महिला शिक्षणदिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचरित्रातील मूल्ये शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com