esakal | Maharashtra Bandh : मुंबईत बेस्ट, रिक्षा टॅक्सी बंद राहणार
sakal

बोलून बातमी शोधा

best bus

Maharashtra Bandh : मुंबईत बेस्ट, रिक्षा टॅक्सी बंद राहणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र बंदचे पडसाद उद्या मुंबईतही उमटणार आहे. रेल्वे वगळता सर्व वाहतूक सेवा बंद राहाण्याची शक्यता आहे. सरकारी कामकाजावर परीणाम होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Corona Update : राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली

उत्तर प्रदेशातील घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार मधिल घटक पक्षाने बंदची हाक दिली आहे. शिवसेना या बंदत सहभागी असल्याने शिवसेना प्रणित संघटनांनीही बंदला पाठींबा दिला आहे. त्यामुळे रिक्षा टॅक्सी सेवा मोठ्या प्रमाणात बंद राहाण्याची शक्यता आहे.तर,बेस्टटचे कामगारही बंद मध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेस्ट सेवेवर परीणाम होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: PM मोदी 11 ऑक्टोबरला 11 वाजता करणार स्पेस असोसिएशनचे उद्घाटन

शिवसेनेसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी संबंधीत असलेल्या सर्वच कामगार संघटना बंद मध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे सरकारी तसेच खासगी कार्यालयांमधील कामकाजावर परीणाम होण्याची शक्यता आहे.

loading image
go to top